आय.टी. विभाग
विभागाची स्थापना :-
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेंतर्गत दि. १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार आयटी व प्रसारमाध्यम विभागांतर्गत आयटी विभागाची स्थापना करण्यात आली.
विभागाची संरचना / पदसंरचना :-
पदाचे नाव |
मंजूर पदे |
कार्यरत पदे |
उपसंचालक (आय.टी व प्रसारमाध्यम) |
1 |
1 |
वरिष्ठ अधिव्याख्याता |
1 |
0 |
अधिव्याख्याता |
1 |
1 |
अधिक्षक गट ब |
1 |
1 |
लिपिक /डाटा एन्ट्री ऑप. |
2 |
0 |
विषय सहायक |
2 |
0 |
कंत्राटी नियुक्तीने(CSR) |
1 |
0 |
शिपाई |
2 |
1 |
विभागाची उद्दिष्टे व कार्य :-
- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे चे संकेतस्थळ अद्ययावत ठेवण्याचे व्यवस्थापन पाहणे.
- दीक्षा प्रणाली अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे शैक्षणिक साहित्याचे व्यवस्थापन पाहणे.
- महाराष्ट्र राज्याच्या एकूण पाच पीएमई विद्या वाहिन्यांचे व्यवस्थापन पाहणे.
- राज्यातील शिक्षकांच्या आय.सी.टी कौशल्यांचे सक्षमीकरण करणे.
- शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरासाठी शिक्षकांना प्रोत्साहन पर उपक्रम आयोजित करणे.
- राज्यातील शिक्षकांचे तंत्रज्ञान आधारित अध्यापन कौशल्य समृद्ध करण्यासाठी काम करणे.
- परिषदेच्या एस सी इ आर टी महाराष्ट्र या youtube चॅनलचे व्यवस्थापन पाहणे.
- राज्यातील शिक्षकांच्या आय.सी.टी कौशल्यांचे सक्षमीकरणासाठी विविध कार्यशाळा व प्रशिक्षणे घेणे.
- अशासकीय संस्थांचे प्रस्ताव छाननी करुन गाभा समितीसमोर सादर करणे.
विभागाचे उपक्रम :-
- शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विभागाने स्टार प्रकल्प अंतर्गत राज्यातील पाच पीएमई विद्या वाहिन्यांसाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या महत्त्वाच्या सर्व विषयांसाठी 2560 व्हिडिओंची निर्मिती केली आहे.
- शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये स्टार प्रकल्प अंतर्गत इयत्ता चौथी व पाचवीच्या सर्व विषयांसाठी मिळून सामान्य विद्यार्थ्यांसाठी 500 व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयएसएल आधारित पाचशे असे एकूण 1000 व्हिडिओ निर्मिती करून दीक्षा प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये आयसीटी आधारित अध्यापनशास्त्र या विषयावर दर रविवारी युट्युब वर वेबिनार मालिका घेण्यात आली.
- शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये स्टार प्रकल्प अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीच्या सर्व विषयांसाठी मिळून एकूण 1000 व्हिडिओ निर्मिती करून दीक्षा प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा घेण्यात आली.
- शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे या संस्थेमध्ये एकूण 27 तज्ञ अधिकारी व शिक्षकांना स्मार्टफोनच्या माध्यमातून शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीसाठी प्रशिक्षण देण्यात आले.
- शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये PMSHRI प्रकल्प अंतर्गत एकूण ६ ऑनलाईन कोर्स निर्मिती करण्यासाठी परिषदेत घटकसंच विकसन कार्यशाळा घेण्यात आली.