राज्य साक्षरता केंद्र
SCL

स्थापना व शासन निर्णय :-
राज्य साक्षरता केंद्राची स्थापना शासन निर्णय क्रमांक: नभासा- ०३२२/प्र.क्र.३९/एस.डी.-२, दि.१४.१०.२०२२ नुसार झाली आहे.
उद्दिष्टे व कार्य :-
-
1. राज्य शासनाच्या मान्यतेने सर्वांसाठी शिक्षण (प्रौढ शिक्षण) अभ्यासक्रम आराखडा स्वीकारणे/अनुकूल करणे/ भाषांतरित करणे.
2. शैक्षणिक, तांत्रिक आणि संसाधन सहाय्य प्रदान करणे.
3. विविध घटकांवर आधारित ऑनलाइन/ऑफलाइन प्रशिक्षण मॉड्यूल्स, ई-अध्यापन साहित्य (TLM), ई-प्रायमर, ई-सामग्री तसेच राज्याच्या स्थानिक संदर्भानुसार, गरजा आणि आवश्यकतांनुसार स्थानिक भाषा/बोलीभाषांमधील साहित्य विकसित/अनुकूलित करणे.
4. राज्य/जिल्हा स्तरावर आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIETs)/गट संसाधन केंद्र (BRCs)/CRCs तसेच शाळा स्तरावर जिल्हा संसाधन व्यक्तींचे प्रशिक्षण ऑफलाइन/ऑनलाइन मॉड्युल्सद्वारे आयोजित करणे.
5. जिल्हा स्तरावरील प्रशिक्षकांसाठी आणि विद्यार्थी-स्वयंसेवक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी स्वयंसेवक मार्गदर्शक पुस्तिका राष्ट्रीय साक्षरता केंद्र (CNCL) ने विकसित केलेल्या पुस्तिकांवर आधारित तयार/अनुकूलित/भाषांतरित करणे.
6. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (SCERT)चे संचालक यांच्या सल्ल्याने दरवर्षी वार्षिक कार्य योजना आणि अर्थसंकल्प (AWP&B) तयार करणे. ULLAS च्या AWP&B मध्ये सादर करण्यासाठी राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण (SLMA) यांच्याकडे पाठवणे.
7. राज्यास शैक्षणिक आणि संसाधन सहाय्य देण्यासाठी राष्ट्रीय साक्षरता केंद्र (राष्ट्रीय साक्षरता केंद्र (CNCL), NCERT, भारत सरकार यांच्यासोबत काम करणे.
8. उत्कृष्ट पद्धती, शिकण्याचे अनुभव आणि यशोगाथा यांचे दस्त ऐवजीकरण करणे व वार्षिक अहवाल प्रकाशित करणे.
9. राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणास (SLMA) शैक्षणिक सल्ला आणि गुणवत्तापूर्ण अभिप्राय देणे.
10. DSEL, भारत सरकार आणि राष्ट्रीय साक्षरता केंद्र (CNCL), NCERT तसेच राज्य शासनाने सोपवलेली इतर कामे पार पाडणे.
विभागाची संरचना /पद संरचना :-
अ.क्र. | पदाचे नाव | मंजूर पदे | कार्यरत पदे |
---|---|---|---|
१ | उपसंचालक | १ | १ |
२ | वरिष्ठ अधिव्याख्याता | १ | १ |
३ | अधिव्याख्याता | १ | १ |
४ | विस्तार अधिकारी | १ | १(विषय सहायक) |
५ | विषय सहायक | २ | २ |
६ | प्रोग्रामर | १ | ० |
७ | डेटा एंट्री ऑपरेटर | १ | ० |
उपक्रमांची यादी :-
राज्य साक्षरता केंद्र विभागाने राबविलेल्या उपक्रमांची यादी.
(उपक्रम/प्रशिक्षण/कार्यशाळा)
-
१. नव साक्षरांसाठी अभ्यासक्रम विकसित करणे.
२.नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत उल्लास प्रवेशिका भाग १ ते ४,स्वयंसेवक मार्गदर्शिका प्रश्नपत्रिका,कृतीपात्रिका,मूल्यमापन पत्रिका,प्रश्नपेढी इ साहित्य तयार करणे.
३.विकसित करण्यात आलेले साहित्य दीक्षा,उल्लास व SCERT च्या Website वर उपलब्ध करून देणे.
४. राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण(TOT).
५. INFO-GRAPHICS, POSTERs, FLYERs निर्मिती कार्यशाळाआयोजन.
६. उल्लास मेला - नवी दिल्ली राष्ट्रीय स्तरावरील उल्लास मेळाव्यात सहभाग.
७. प्रश्नपत्रिका भाषांतर कार्यशाळा- मराठी भाषेतील प्रश्नपत्रिकेचे बंगाली, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, हिंदी, इंग्रजी, उर्दू या ८ भाषेत भाषांतर करणे.
८. उल्लास App प्रशिक्षण - स्वयंसेवक व शिक्षक यांना उल्लास App बद्दल प्रशिक्षण देणे.
९. विद्यार्थ्यांमार्फत “या दिवाळीला साक्षरतेची भेट देऊया, सर्वांचे जीवन समृद्ध करूया.” हा उपक्रम सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळा व अध्यापक विद्यालयांमध्ये राबविणे.
१०. राज्यस्तर शिक्षण परिषद- १६ व १७ ऑक्टोबर २०२३.
११. सराव प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तर पत्रिका निर्मिती.
१२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT)- दि.१७ मार्च २०२४ रोजी राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण यांच्या समन्वयाने नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली.
सन २०२४ - २५
-
१.सराव प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तर पत्रिका निर्मिती.
२. नवसाक्षरांच्या अध्ययन अध्यापनासाठी विकसित करण्यात आलेले साहित्य विविध डिजिटल Platforms वर उपलब्ध - DIKSHA platform, ULLAS, व SCERT Website.
३.CNCL, NCERT यांच्या website वर उल्लास साहित्य मराठी भाषेत उपलब्ध.
४. उल्लास राज्यस्तरीय मेळावा - २९ व ३० सप्टेंबर २०२४.
५. व्हिडिओ निर्मिती.
६.नव साक्षरता कार्यक्रम वारी साक्षरतेची या उपक्रमाद्वारे साक्षरता जनजागृती.
७. Capacity Building program of SRG under ULLAS - दि. 12 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024.
८. साक्षरता वर्ग व स्वयंसेवक प्रशिक्षण.
९.सामाजिक चेतना केंद्र –समाजिक चेतना केंद्राच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आलेल्या असून लवकरच प्रसारित केल्या जातील.
१०.उल्लास राज्य विशेषांक – नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत उल्लास राज्य विशेषांक तयार करण्यात आला.
११. FLNAT परीक्षा २०२५- दिनांक २३ मार्च २०२५.
१२. प्रसिद्धी व जनजागृती -
१.आकाशवाणीच्या माध्यमातून प्रचार प्रसार.
२. विविध वृत्तपत्रामधून प्रसार.
3. गणेश उत्सव व नवरात्री तसेच आषाढी एकादशीच्या माध्यमातून वारी साक्षरतेची सारखे उपक्रम राबवण्यात आले.
१३.विविध परिषदा व अभ्यास दौरा -
१.आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कार्यक्रम - नवी दिल्ली
२.क्षेत्रीय संमेलन -भोपाल
३. राजस्थान अभ्यास दौरा करून राजस्थान.
फोटोगॅलरी :-
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |